नमस्कार मित्रानो 10 वी पास असलेल्या उमेदवारांना नौकरीची उत्तम संधी आहे, आता ITBP अंतर्गत 800+ जागासाठी हि भरती असेल, यासाठी तुम्ही अर्ज कशाप्रकारे करू शकतात ते आपण पाहूया. ( ITBP Recruitment 2024 ) यामध्ये वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता तसेच अर्ज करण्याची पद्धत, चलन सर्व बाबी आपण या लेखामध्ये पाहूया. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.
पदाचे नाव – कॉन्स्टेबल किचन सर्व्हिस.
एकूण पद आणि संख्या
मित्रानो ITBP इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत एकूण 819 जागासाठी भरती आहे. हि भरती त्यासाठी कॉन्स्टेबल ( स्वयंपाक घर सर्व्हिस ) असे पदाचे नाव आहे. यासाठी तुम्ही अर्ज करू शकतात.
ITBP Recruitment 2024
अर्ज करण्यासाठी लागणारे वय. Age Limit
मित्रानो ITBP अंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला एकूण वय हे कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 25 वर्षापर्यंत दिलेले आहे. 18 ते 25 यामध्ये जर तुमचे वय असेल तरच तुम्ही यासाठी अर्ज करू शकतात.
अर्जाचा सुरु आणि शेवटचा दिनांक. Last Date
अर्ज भरण्यास 1 सप्टेंबर पासुन सुरु होणार आहे, तसेच अर्ज करण्यासाठी शेवट दिनांक हा 1 ऑक्टोबर 2024 आहे. या तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
शिक्षणिक अहर्ता – Education Qualification
ITBP अंतर्गत भरण्यात येणाऱ्या अर्जासाठी तुमची शिक्षणिक पात्रता हि अशी आहे की
- अर्जदार हा 10 वी उत्तीर्ण असावा.
- हॉटेल मॅनेजमेंट सारखा एखादा कोर्स असावा
- अर्जदाराकडे अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
मित्रानो या पदाकरिता अर्ज करताय तर तुम्हाला यासाठीचे वेतन माहिती असणे आवश्यक आहे, यांचे वेतन मान हे सातव्या वेतन आयोगानुसार 21 हजार ते 70 हजार पर्यंत आहे. वयाची अट जर पाहिली तर SC, ST 5 वर्ष सूट देण्यात आलेली आहे आणि OBC 3 वर्ष सूट दिलेली आहे.
ITBP Recruitment 2024
अर्ज कसा करायचा.? Online Form
- मित्रानो तुम्हाला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ ची लिंक खाली दिलेली आहे तेथून तुम्ही अर्ज करू शकतात.
- याकरिता ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज करत असताना तुम्हाला 10 वी पास चा मार्क मेमो, टी. सी. अपलोड करावा लागेल.
- यानंतर तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो आणि सही सुद्धा अपलोड करावी लागेल
- तुमच्याकडे जात प्रमाणपत्र असेल तर ते सुद्धा अपलोड करणे गरजेचे आहे.
- मोबाईल नंबर आणि मेल आयडी हा व्यवस्थित द्यायचा आहे.
- संपूर्ण अर्ज भरल्यानंतर प्रिंट काढावी आणि व्यवस्थित ठेऊन द्यावी
- त्यावरील रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला नंतर कामी येईल
अशा प्रकारे वरील संपूर्ण माहिती वाचून अर्ज करा
🔖 ऑफिशियल वेबसाईट – क्लिक करा
🔖 जाहिरात – PDF साठी क्लिक करा