एस टी महामंडळ मधील कर्मचाऱ्यांसाठी सरकारची नवीन योजना Karmavir Bhaurao Patil Yojana 2023.
Government Scheme : नमस्कार मित्रानो ST, कर्मचारी हे सामान्य प्रवाशांसाठी दिवसरात्र करून सेवा देतात त्यात त्यांचे पगार कमी यामुळे त्यांच्या मुलांचे शिक्षण योग्य रित्या पूर्ण होतं नाही. त्यात पुन्हा घरचे भाडे दवाखाने हे सर्व बाबी तितक्याच वेतनामध्ये कराव्या लागतात.
एस टी महामंडळ मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थोडासा आधार मिळावा याकरिता राज्य सरकार मार्फत कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण अग्रीम योजना ( Karmavir Bhaurao Patil Yojana 2023 ) राबविण्यात येत आहे या योजनेची सुरुवात 2018 मध्ये करण्यात आलेली आहे मात्र कर्मचाऱ्यांकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नाही .
ही योजना एस टी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शिक्षण घेण्याकरिता सुरु करण्यात आलेली आहे, कर्मचाऱ्यांच्या शिक्षणाचा बोजा हा कामगारावर येऊ नये तसेच जे पाल्य महाविद्यालयाचे शिक्षण घेत आहेत अशांचे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील अग्रीम योजना सुरु करण्यात आली. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचे शिक्षण हे व्यवस्थित पूर्ण होणार आहे.
या योजनेत कामगारांना मुलांच्या वार्षिक शुल्कची रक्कम ही अग्रीम म्हणुन देण्यार असून नंतर ते दरमहा वेतनातून ठराविक कालावधीत कपात करण्यात येईल. या योजनेअंतर्गत कामगारांना मुलांचे उच्च शिक्षण शुल्क भरण्याकरिता 12 ते 24 हफ्त्यांची उचल देण्यात येते तसेच परदेशी शिक्षण घेणाऱ्या मुलांचा सर्व खर्च हा एस टी मार्फत करण्यात येणार आहे. Government Scheme
✔️ अग्रीम योजनेकरिता पात्रता.
- ही योजना फक्त एस टी कर्मचाऱ्यांसाठी आहे.
- कर्मचारी हा एस टी महामंडळात चालक, वाहक, आणि तांत्रिक पदावर कार्यरत असावा
- कामगारांच्या मुलाचा कोणत्याही शाखेत महाविद्यालयात प्रवेश असावा.
- कर्मचाऱ्याने घेतलेली उचल ही 12 ते 24 हफ्त्यात फेडण्याकरिता तो सक्षम असावा.
Karmvir Bhaurao Patil Agrim Yojana 2023
✔️ लागणारी कागदपत्रे.
- एस टी कर्मचारी आणि मुलाचे आधार कार्ड
- ओळखपत्र
- रहिवाशी प्रमाणपत्र PPF Passbook
- सॅलरी स्लिप
- एस कर्मचाऱ्याचा बक्कल नंबर
- महाविद्यालयात प्रवेश घेतल्याची पावती.
- मागील वर्षीची गुणपत्रिका 12 वी किंवा त्यावरील.
Employees update
✔️ असा करा अर्ज.
Government Scheme कर्मचारी मित्रानो कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण अग्रीम योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर प्रत्येक आगारात तसेच, सर्व विभागीय कार्यालयात अर्ज उपलब्ध आहेत. तो अर्ज व्यवस्थित भरून त्यासोबत वर दिलेली कागदपत्रे जोडायची आहेत.
कागदपत्रांच्या 1-1 प्रति जोडाव्या लागतील नंतर ते अर्ज विभागीय कार्यालय येथे जमा करावे, जमा झाल्यानंतर तुम्हाला रिसीट देण्यात येईल ती पुढील भविष्यात उपयोगी येईल याकरिता सांभाळून ठेवा. अर्ज केल्यानंतर ST अधिकारी अर्जाची छाननी करतील ही छाननी झाली कि रक्कम तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येईल. यामुळे या रकमेतून तुम्ही तुमच्या मुलांची शिक्षण पूर्ण करू शकताल.
याबाबत अजुन संपूर्ण माहिती तुम्ही जवळच्या आगारात जाऊन काढू शकतात तेथे जाऊन तुम्ही अर्ज घेऊन ते अर्ज त्याच ठिकाणी सबमिट करू शकतात.